*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालय येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन*
*दोडामार्ग : शुभम गवस*
आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय येथे आज २२ जानेवारी रोजी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मार्फत खाद्य महत्त्वाचे आयोजन करण्यात आले.
महोत्सवामध्ये विशेष पदार्थ :साबुदाणा वडा,सामोसा,रवा खीर,कांदा भजी,कोबी मंचुरियन,चिकन बिर्याणी,मेथी पराठा,शिंपले नाचण्याची भाकरी,पुरण पोळी,यल्लापे,कोकम सरबत, लिंबू सोडा ,पाणीपुरी असे पदार्थ करण्यात आले.या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून; प्रा.उमेश परब,जिल्हा क्षेत्र समन्वयक,आजीवन अध्ययन व विस्तार विभाग,अध्यक्ष:प्रा.एम व्ही गोळसे.तसेच परीक्षक म्हणून प्रा.उमेश परब,ए.बी ढेंगे,प्रतीक्षा बागडी लाभले.
कार्यक्रमाची प्रास्ताविका प्रा.महेश पाटील आणि आभार प्रदर्शन प्रतिक्षा ऐनापुरकर यांनी केले.या खाद्य महोत्सवाच्या उद्घानासाठी प्रा.उमेश परब,एस.व्ही.मोरे,प्रा.एम व्ही गोळसे, एन एम चौगुले,अनुराग सिनारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे बक्षीस वितरण २६ जानेवारीला होणाऱ्या कलागंध २०२५ या कार्यक्रमात जाहीर करण्यात येतील.