*कोंकण एक्सप्रेस*
*श्री आई उगवादेवीचा २४ रोजी गोंधळ उत्सव*
*कणकवली :प्रतिनिधी*
श्री आई उगवादेवी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव अखिल ओलवन ग्रामस्थ परिवार (ओलवन दाजीपुर)यांच्या वतीने २४ जानेवारी रोजी उगवदेवी मंदिर येथे सायंकाळी ७.०० वा. ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत आजोजित करण्यात आलेला आहे.रात्री पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व भाविकांनी गोंधळ उत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन निमंत्रक व आयोजक सुभाष पाटील व समस्त ओलवन दाजीपुर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

