*कोंकण : एक्सप्रेस*
*साटेली मध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून मायनिंग बंदची पुकार*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील साटेली हे गाव कोकणात निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे.हे गाव नैसर्गिक खनिजाने परिपूर्ण असून या गावात मायनिंगचा व्यवसाय गेली बरेच वर्ष अंतर्भूत चालू आहे.या गावातील बरेचसे नैसर्गिक खनिज काही दिग्गज कंपन्यांच्या माध्यमातून उत्खनन करून हे खनिज काढून नेण्याचा प्रयत्न चालू आहे.अवघ्या दोन दिवसांपूर्वीच ह्या चाललेल्या उत्खननाला साटेली गावातील ग्रामस्थांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता.त्या पार्श्वभूमीवर भविष्यात गावाला या उत्खननाने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.भविष्यात हे मायनिंग चालू राहिल्यास महाराष्ट्रातील माळीण गाव प्रमाणे ह्या साटेली गावाची परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर या गावावर भविष्यातील येणारे संकट दिसून येत आहे.
त्यामुळे मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सर्व ग्रामस्थांनी गाव ग्रामसभा घेऊन कायमस्वरूपी मायनिंग काढण्यास बंदची पुकार दिली. ग्रामपंचायत मध्ये तसा ठराव पास करून घेण्यात आला आहे. भविष्यात कुणी ठेकेदारांनी हे मायनिंग चालू ठेवले असल्यास रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी ( प्रजासत्ताक दिन ) जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचे ग्रामसभेत निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये गावातील सरपंच, उपसरपंच, देवस्थान मानकरी, देवस्थान कमिटी तसेच गावातील सुजन नागरिक आणि महिला वर्ग हे सर्व उपस्थित राहून या सभेच्या माध्यमातून या मायनिंग उत्खननाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.