बेपत्ता वाळू कामगाराचा मृतदेह शेलटी खाडीकिनारी आढळला

बेपत्ता वाळू कामगाराचा मृतदेह शेलटी खाडीकिनारी आढळला

*कोंकण एक्सप्रेस*

*बेपत्ता वाळू कामगाराचा मृतदेह शेलटी खाडीकिनारी आढळला*

*तळाशील मधील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल*

*एक जण ताब्यात,अन्य चौघांचा शोध सुरूच*

*मालवण : प्रतिनिधी*

रेवंडी खाडी किनारी वाळू उपसा करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या नौकेतून आलेल्या काही जणांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती.यात जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडलेल्या एका वाळू कामगाराचा मृतदेह आज सकाळी शेलटी खाडी किनारी आढळून आला.याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तळाशील येथील पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील एका संशयित आरोपीस पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे.अन्य चार जणांचा शोध सुरू आहे.

याबाबतची माहिती अशी की,गेले काही दिवस तळाशील खाडीत पत्रात वाळू उपसा प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे यात रविवारी रात्री रेवंडी खाडीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या होडीत असलेल्या पाच कामगारांवर एका छोट्या होडीतून आलेल्या तळाशील येथील काही जणांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली.या हल्ल्यात एक वाळू कामगार जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडून बेपत्ताहोता.गेले दोन दिवस त्याचा शोध घेण्यात येत होता.यात आज सकाळी शेलटी खाडीकिनारी त्या वाळू कामगाराचा मृतदेह सापडून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. माने, सुहास पांचाळ, हेमंत पेडणेकर, सुशांत पवार यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

या हल्ला प्रकरणी विकास विलास चेंदबणकर रा. रेवंडी तांडेलवाडी यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार काल रात्री संशयित आरोपी ललित देऊलकर (वय-३०), तेजस सादये (वय- २६) दोन्ही रा. तोंडवळी तळाशील यांच्यासह अन्य तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी ललित देऊलकर याला आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर अन्य चार जणांचा शोध सुरू आहे. संशयित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!