*कोंकण एक्सप्रेस*
*लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय खाद्य महोत्सवाचे आयोजन*
*दोडामार्ग : शुभम गवस*
लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय दोडामार्ग येथे आज बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मार्फत खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.महोत्सवामध्ये विशेष पदार्थ बिर्याणी,चिकन पुरी,छोले पुरी,गुलाब जामुन,गोबी मंच्युरियन,चिकन पकोडे असे पदार्थ करण्यात आले.
या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून; प्रा.उमेश परब,जिल्हा क्षेत्र समन्वयक,आजीवन अध्ययन व विस्तार विभाग,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुभाष सावंत,तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सोपान जाधव,आणि आभार प्रदर्शन प्रा.भाग्यश्री गवस यांनी केले.या खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनासाठी प्रा.उमेश परब,प्राचार्य डॉ. सुभाष सावंत ,कल्पेश गवस ,सोपान जाधव, भाग्यश्री गवस,शेफाली गवस, एस.यु.दरेकर या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.