*कोंकण एक्सप्रेस*
*जेनिफर लोबो यांचा उपोषणाला यश;, मंजुरी घेऊन काम करण्याचे आश्वासन*
*दोडामार्ग : शुभम गवस*
भोमवाडी रस्ता कालव्यानजिक, भोमवाडी कुडासे, येथील जाणाऱ्या कालव्याला संरक्षण कठडा बांधण्याबाबत व रस्त्याचे काम करण्याबाबत
शिवसेना उबाठा पदाधिकारी यांनी साटेली भेडशी भोमवाडी येथे १५ जानेवारी रोजी उपोषणाला माजी ग्रा. पं. सदस्य जेनिफर लोबो यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले होते. अखेर जलसंपदा विभाग अधिकारी यांच्यावतीने कर्मचारी पाठवून संरक्षण कठडा बांधकाम करण्यासाठी महामंडळाची मान्यता घेऊन मार्च पूर्वी निविदा काढून काम केले जाईल. तसेच कालवा रस्ता खडीकरण केले जाईल असे लेखी पत्र दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.
यात प्रमुख मध्यस्थिती उबाठा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी केली.