*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा सिंधुदुर्ग आयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
भाजपा सिंधुदुर्ग आयोजित ” संविधान गौरव अभियान ” अंतर्गत वेंगुर्ले तालुकस्तरीय शालेय गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.यात
शालेय गट इयत्ता ७ ते १० वी साठी वक्तृत्व स्पर्धा दिनांक – २३ / ०१ / २५ रोजी दुपारी – २ -३० वाजता वेंगुर्ले हायस्कूल,वेंगुर्ले येथे होणार असून त्यासाठी “माझा अभिमान माझे संविधान” हा विषय ठेवण्यात आला आहे.यासाठी ६ ते ७ मिनिटांचा वेळ ठेवण्यात आला आहे.
दिनांक – २५ / १ / २०२५ रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्याकरिता दुपारी २ – ३० वेळ तिवण्यात आले आहे.स्थळ — साई मंगल कार्यालय , सुंदरभाटले , वेंगुर्ला असून विषय- माझ्या शाळेतील ध्वजारोहण सोहळा असा आहे. यासाठी जलरंग वापरणे अनिवार्य असून आयोजकांकडून कागद पुरविण्यात येईल.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळा शिफारस किंवा ओळखपत्र अत्यावश्यक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक – १००१ सन्मान चिन्ह,व्दितीय क्रमांक – ७०१ सन्मान चिन्ह,तृतीय क्रमांक – ५०१ सन्मान चिन्ह,उत्तेजनार्थ प्रथम २५१ सन्मान चिन्ह,
उत्तेजनार्थ व्दितीय २५१ सन्मान चिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणी संपर्क – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई – ९४२२ ४३६ ६७७ ,सई चेंदवनकर भाजपा कार्यालय , वेंगुर्ले ७७ १९९८ ३०६३ .

