*कोंकण एक्सप्रेस*
*राज्य उत्पादन शुल्क सिंधुदूर्गची कनेडीत कारवाई ; बेकायदा दारूसह ४ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त*
*कणकवली : प्रतिनिधी*
नववर्षाच्या पाश्वभूमीवर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदूर्ग यांचेंतर्गत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सिंधुदूर्ग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि 27/12/2024 रोजी मौजे दारिस्ते कनेडी मार्गावरील आतील कच्च्या रस्त्यावर मारुती ओम्नी यामध्ये गोवा बनावटी दारूचे एकूण ४१ बॉक्स मिळून आले. मात्र संशयित फरार झाल्याने हाती लागू शकला नाही.

