वेंगुर्ले येथे २९ डिसेंबर रोजी “संविधान सन्मान परिषदे”चे आयोजन

वेंगुर्ले येथे २९ डिसेंबर रोजी “संविधान सन्मान परिषदे”चे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले येथे २९ डिसेंबर रोजी “संविधान सन्मान परिषदे”चे आयोजन*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग सावित्रीबाई फुले महिला मंडळ वेंगुर्ले आनंदवाडी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वेंगुर्ले बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ले, दलित सेवा संघ यांच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सव २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन हाच खरा भारतीय स्त्रीमुक्ती दिन,१ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन, ३ जानेवारी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती या निमित्ताने रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे ‘संविधान सन्मान परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेचे उद्घाटन बेंगलोर कर्नाटक येथील जेष्ठ कलाकार, कवी, लेखिका आणि महिला घरकामगार संघटनेच्या नेत्या श्रीमती सरस्वती यांच्या एकपात्री प्रयोगानें होणार आहे.

या परिषदेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष महाराष्ट्रातील अभ्यासू विचारवंत आणि परखड वक्ता अॅड. सर्वजीत बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी काँग्रेस भाजपा प्रणित आघाड्यांचे संविधान प्रेम भारतीय समाजाला न्याय देईल का ? आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी व संवर्धनासाठी लढाऊ चळवळ उभी करण्यासाठी काय ? या दोन विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील लढाऊ कार्यकर्ती धम्म संगिनी रमा गोरख (नागपूर), मुक्ती संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष संग्राम सावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता वकील उत्तम कदम, वकील श्री सगुण हे मांडणी करणार आहेत. यावेळी जागतिक कीर्तीचे नाटककार डा अनिल जिजाबाई सरमळकर,भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.विजयालक्ष्मी चिंडक हे उपस्थित राहणार आहेत.

वैचारिक दृष्ट्या परिपूर्ण असा हा कार्यक्रम संसदेत गृहमंत्री अमीत शहा यांच्या परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेलं अवमानकारक वक्तव्य, परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील संविधानाची प्रतिकृती ची केलेली विटंबना, कायद्याचा विद्यार्थी शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडित असताना मारहाणीत झालेला निघृण खून, बीड मध्ये सरपंचाची करण्यात आलेली निघृण हत्या आणि evm विरोधी आंदोलन गती घेत असल्याने त्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षाने चालवलेली कृती याबाबत प्रोबोधन करणे आणि संविधान सन्मानासाठी लोकांना लढाईस तयार करण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. तरी जिल्ह्यातील आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते आणि संविधान मानणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सावित्रीबाई फुले महिला मंडळ आनंदवाडी वेंगुर्ला अध्यक्ष सुहानी जाधव, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, दलित सेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध हितावर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा वेंगुर्ला चे तालुका अध्यक्ष प्रेमानंद जाधव, जयंत जाधव, यशवंत जाधव, बाप्पा आसोलकर, गजानन जाधव आणि वेंगुर्ला तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!