सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टरांची आवश्यकता

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टरांची आवश्यकता

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टरांची आवश्यकता*

*एकच भूलतज्ञ असल्याने महिला डॉ.क्षमा देशपांडे यांच्यावर कामाचा ताण*

*राजेंद्र मसुरकर यांची मागणी*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे भुलतज्ञ सौ. डॉक्टर क्षमा देशपांडे यांनी बरेच वर्षे भुलतज्ञ म्हणून सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिलेली आहे.एकच भूलतज्ञ असल्याने या महिला डॉक्टर क्षमा देशपांडे यांना अनेक रुग्ण दिवसेंदिवस सावंतवाडी रुग्णालयात वाढत असल्याने कामाचा ताण वाढत आहे.

यासाठी दोन भूलतज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते परंतु एकच भूलतज्ञ अनेक वर्षे काम करत असल्याने कामाचा ताण वाढल्यामुळे त्यांनी लवकरच आपल्याकडे राजीनामा पाठवलेला आहे.यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर स्त्रियांची प्रसूती याव्यतिरिक्त जनरल सर्जन ची शस्त्रक्रिया अपेन्डिस,हर्निया असे विविध प्रकारचे रुग्ण आमच्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये बराचश्या प्रमाणात येत असतात.

ही सुद्धा शस्त्रक्रिया भूलतज्ञ नसल्याने थांबणार आहे.गोरगरीब रुग्णांना अन्यत्र खाजगी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार आहे.गोरगरीब रुग्णांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारे नसून कामाचा ताण पाहता यासाठी आपण आम्हाला कमीत कमी दोन भूलतज्ञ डॉक्टर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये मिळावे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दरमहा 350 सून अधिक गरोदर स्त्रिया प्रसुती होतात.त्यामध्ये सरासरी 150 हून अधिक गरोदर स्त्रियांची प्रसूतीसाठी सिजरिंग करावे लागते.महिला गरोदर असताना गोरगरीब रुग्ण तालुका व खेड्यापाड्यातून प्रसुती करण्यासाठी बरेचदा सावंतवाडी मध्ये भुलतज्ञ व स्त्रीरोगतज्ञ नसल्याने अनेक गरोदर माता जिल्ह्याच्या ठिकाणी अशा रुग्णांना जावे लागणार आहे.यामध्ये वाटेतच ॲम्बुलन्स मध्ये गरोदर माता प्रसूती होतात .असे अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये येत आहे. अनेक गरोदर मातांचा पुनर्जन्म गरोदरपणा प्रसूती होताना होतो.

यासाठी आपल्याला विनंती आहे की सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पन्नास हजार रुग्ण बाह्य रुग्ण सावंतवाडी मध्ये गेल्या सात महिन्यांमध्ये तपासणी करून योग्य तो उपचार घेत आहेत.चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा सावंतवाडीमध्ये रुग्णालयात मिळत आहे.यासाठी जर आम्हाला भूलतज्ञ डॉक्टर दोन दिल्यास सावंतवाडी मधील आरोग्य विभागाचे जे उत्तम कार्य चांगले चालले आहे ते याहून अधिक चांगले होऊ शकते व गोरगरीब रुग्णांना सेवा मिळू शकते व आपल्याला ईश्वरी सेवा करण्याचे भाग्य लाभेल व  गोरगरीब रुग्णांचा आशीर्वाद ही मिळेल यासाठी आपण माझ्या विनंती अर्जाचा योग्य तो विचार करून आपण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन भूलतज्ञ डॉक्टर द्यावे अशी विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!