*कोंकण Express*
*फोंडाघाटात पेट्रोल टँकर पलटी होऊन भीषण स्फोट*
*चालकाचा मृत्यू : दोन तासापासून वाहतूक ठप्प*
*कणकवली : प्रतिनिधी*
कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन टँकरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते.सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
फोंडाघाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला.त्यानंतर टँकरने लगेच पेट घेतला.पेट्रोल भरलेले असल्याने झालेल्या भीषण स्फोटामुळे टँकर चालकाचा जळून मृत्यू झाला.स्फोटामुळे तो बाहेर फेकला गेला.
सायंकाळी साडे सहा पासून फोंडाघाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.अग्निशमन बंब मागवून आग आटोक्यात आणल्यानंतर घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.अपघातस्थळी कणकवली पोलीस रवाना झाले आहेत.