*कोकण Express*
*आचरा रस्त्यावर फणसनगर सावंतवाडा येथे अपघात….!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
समोरुन येणाऱ्या कारला बाजू देत असताना रिक्षाला अपघात होऊन चालकासह प्रवासी जखमी झाले. कणकवली – आचरा रस्त्यावर फणसनगर सावंतवाडा येथे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
सावंतवाडा येथून कणकवली आचरा महामार्गावर अचानक आलेल्या कार ला बाजू देताना रिक्षा रस्त्यालगत च्या गटारात जाऊन अपघात घडला. अपघातात रिक्षाचे पुढील चाक तुटून पडले होते.रिक्षाचा टफ ही तुटला होता. रिक्षाचालका ला किरकोळ दुखापत झाली तर आतील प्रवासी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला कणकवलीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.