आचरा काझीवाडा येथील मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश

आचरा काझीवाडा येथील मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश

*कोकण Express*

*आचरा काझीवाडा येथील मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश*

*शिवबंधन बांधून आ.वैभव नाईक यांनी केले स्वागत*

*मालवण ः प्रतिनिधी*

आचरा काझीवाडा येथील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी रविवारी सायंकाळी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आचरा काझीवाडा येथे हा पक्ष प्रवेश घेण्यात आला.आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन पक्षाच्या शाली घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे आचरा मतदार संघात शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे.

यावेळी बोलताना आ.वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक भागातील विकास कामे मार्गी लावली जात आहेत. अनेकजण शिवसेना परिवारात जोडले जात आहेत.शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचा योग्य सन्मान केला जाईल. तसेच तुमचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.
काझीवाडा येथील जहेब काझी, सुफियांन काझी, अर्रफद काझी, तंझील शेख, कादर काझी, इम्रान काझी, अझीम काझी, रेहान काझी, तौकिर काझी, बाबू काझी, फरदिन काझी, उमर काझी, उस्मान काझी, झाकीर काझी, नाजीम काझी, जाफर काझी, अमिरुद्दीन काझी, नजमबुद्दीन काझी, हसन शेख, रियाझ काझी, तसेच महिला मधून नबीला नाईक, परवीन काझी, शबिना शेख, यास्मिन काझी, नूरजहाँ काझी यास्मिन काझी, आझमा शेख, रिझवना शेख यांच्या समवेत अन्य महिलांनीही शिवसेना पक्षप्रवेश केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,मालवणचे नगरसेवक मंदार केणी,पक्षप्रवेश घडवून आणणारे शिवसेना उपविभाग प्रमुख जगदीश पांगे,मालवण शिवउद्योग तालुका अध्यक्ष मंगेश गांवकर, पळसंब सरपंच चंदू गोलतकर, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर, समीर लब्दे,विनायक परब, रियाज काझी, भाऊ परब व अन्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!