*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी कोश वाङ्मयाचा परिचय*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला व नगर वाचनालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना कोश वाङ्मय परिचय हा आगवेळा उपक्रम पार पडला . मराठी साहित्यातील कोश वाङ्मयाचे प्रदर्शन व व्याख्यान हा कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी आयोजित केला होता प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले मराठी साहित्यातील कोश वाङ्मयाचा इतिहास विद्यार्थ्यांना उलगडून दाखविला कोश म्हणजे ज्ञानाचा खजिना अभ्यासक ‘ संशोधक व सर्वसामान्य वाचकाला कोश साहित्याची ओळख निर्माण व्हावी तसेच कोशांचे मुख्यप्रकार दोन माहिती कोश व शब्द कोश यांचा परिचय प्रत्यक्ष कोश वाङ्मयाचे कृतीतून माहिती विद्यार्थ्यांना दिली कोश साहित्य कसे निर्माण होते विचारवंत अभ्यासक ज्ञानाचे भांडार कसे निर्माण करतात संपादक मंडळ आणि अभ्यासक यांचा विचारांचे धन मराठी भाषेत समृद्धी निर्माण करत आहे विश्वकोश ‘ संस्कृती कोश ‘ चरित्र कोश ‘ वाङ्ममय कोश / समाज विज्ञान कोश , पक्षीकोश , सुविचार कोश , संख्या संकेत कोश . कृषि विज्ञान कोश , व्युत्पती कोश ‘ मराठी फारशी शब्द कोश ‘ न्यायशास्रकोश , इंग्रजी मराठी शब्द कोश अमर कोश इत्यादी कोशांची निर्मिती स्वंयम प्रेरणेने केली गेली . यातूनच व्यक्तीगत अभ्यासकांनी कोश निर्माण करून संपादन केले . संपूर्ण विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमांचा ज्ञान संवर्धनासाठी उपयोग करून घेतला यावेळी मराठी शिक्षिका सौ सावंत पी पी मॅडम यांनी प्रास्ताविक केले नगर वाचनालयाचे सहकार्यवाहक डी पी तानवडे सर यांनीही मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या पर्यवेक्षिका वृषाली जाधव यांनी शुभेच्छा दिल्या ग्रंथपाल राजन ठाकूर व वाचनालयाचे सर्व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते