*कोंकण Express*
*भुईबावडा पंचायत समितीची बैठक संपन्न*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी व उपजिल्हा प्रमुख रज्जब रमदुल यांनी केले मार्गदर्शन*
*सिंधुदुर्ग -*
भुईबावडा पंचायत समितीची उ.बा.ठा. युवासेनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीस युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, उपजिल्हा प्रमुख रज्जब रमदुल यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी सुशांत नाईक यांनी बोलताना मार्गदर्शन केले की, खासदार विनायक राऊत यांच्या पराभवाच शल्य सगळयांच्या मनात आहे, या पराभवाला खचून न जाता आपल्याला त्याच जोमाने काम करून, येत्या काळात महाविकास आघाडीची सत्ता येणार व उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करणं महत्वाचे आहे, त्याच्यासाठी संघटनात्मक बांधणी करणे गरजेचे आहे, युवासेने च्या दृष्टीने प्रत्येक गावात युवासेनेचे पदाधिकारी नेमण्यात येणार आहेत.या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांना व उपस्थित कार्यकर्त्यांना छत्री वाटप देखील करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी,उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल, विभाग प्रमुख- जितेंद्र तळेकर, उपतालुका संघटक- रमाकांत (बाबा) मोरे, माजी उपतालुका प्रमुख – जनार्धन विचारे, युवासेना उपविभाग प्रमुख राजेश पवार, गणेश धुरी, सुभाष चाळके, प्रमोद शिंदे,सखाराम गुरव, सुरेश चाळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.