विद्यामंदिर प्राथमिक विभाग व इंग्लिश मिडीयम मधिल बालक रंगले वारीच्या दिंडीत

विद्यामंदिर प्राथमिक विभाग व इंग्लिश मिडीयम मधिल बालक रंगले वारीच्या दिंडीत

*कोंकण Express*

*विद्यामंदिर प्राथमिक विभाग व इंग्लिश मिडीयम मधिल बालक रंगले वारीच्या दिंडीत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर प्राथमिक सेमी विभाग व विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मधिक बालवाडी व पहीलेचे विद्यार्थी रंगले पंढीरीच्या वारीमध्ये . आषाढी एकादशीचे निमित्त साधून बालकांच्या मनावर एकात्मतेचे व समतेचे संस्कार करणारे संत विचार नव्या पिढीला समजावे म्हणून प्रशालेतील बालविभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी वारकरी परंपरेचा पोशाख विद्यार्थ्यांना परिधान करून टाळ व मृदंग ‘ पताका ‘ ध्वज यांच्या साथीने डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन परमेश्वराच्या पालकीच्या साथीने वारकरी परंपरेची दंडी शाळेच्या क्रीडांगणातून ते शिवारा देवायलया पर्यंत पायी चालत अभंगाच्या मृदू आवाजात आनंदाने विठूरायाच्या दर्शनाची पंढरपूर वारीचे प्रतिक हुबेहुब तयार करून आनंद सोहळा साजरा केला . या सोहळ्यात सर्व शिक्षक / शिक्षिका पालक तसेच मुख्याध्यापिका सौ करंबेळकर मॅडम व सौ राणे मॅडम तसेच मुख्याध्यापक श्री पीजे कांबळे सर पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम जेष्ठ शिक्षिक श्री अच्यूतराव वणवे सर सहभागी झाले होते . या वारकरी दिंडीला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा श्री तवटे साहेब चेअरमन डॉ सौ साळुंखे मॅडम सचिव मा श्री वळंजू साहेब व सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!