*कोंकण Express*
*वैभववाडी रेल्वे, बस स्थानकांच्या विकासाठी नियोजन सभेत केली निधीची मागणी – सुधीर नकाशे…*
*वैभववाडी / प्रतिनिधी*
सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, ओरस रेल्वे स्थानकांप्रमाणेच वैभववाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरण करण्यात यावे. तसेच वैभववाडी बसस्थानकाचा परिसर कॉक्रीटीकरण करावा, वैभववाडी बसस्थानक आणि वैभववाडी रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सर्व सुखसोयीसहीत परीपुर्ण करण्यासाठी निधी मिळवा अशी मागणी माजी जि.प.सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे यांनी जिल्हा नियोजन समिती सभेत केली
पालकमंत्री तथा समिती अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे वैभववाडी रेल्वे स्थानक आणि बसस्थानक सुशोभीत होणार