*कोंकण Express*
*उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा इमान,स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्या समोर गहाण ठेवला*
*आमदार नितेश राणे यांचा घणाघात*
*हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर वैष्णोदेवी भक्तांवर हल्ला करणाऱ्यांना इशारा दिला असता*
*उबाठा मध्ये दहशतवाद्यांना अद्दल घडवू असे बोलण्याची हिम्मत नाही*
*पाकिस्तानचे झेंडे फडकविणारे उबाठा चे 9 खासदार निवडून देणारे आहेत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भक्तांच्या बस गाडीवर दहशतवादी हल्ला झाला. आज पर्यंत 18 वैष्णोदेवी भक्तांनी या हल्ल्यात प्राण गमावले. आज हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर अशा दहशतवाद्यांना थेटच इशारा दिला असता. बाळासाहेब हे मुंबईत बसून पाकिस्तान हादरवून सोडण्याची असलेले नेते होते. मात्र आताची उबाठा आणि त्यांचे नेते प्रवक्ते हे राजकारणा पलीकडे काहीच बोलत नाही. दहशतवाद्यांना अद्दल घडवू असे बोलण्याची त्यांच्या हिम्मत नाही. कारण पाकिस्तानच्या घोषणा देणारे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविणारे उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून देणारे आहेत. उबाठा चे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा इमान स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्या समोर गहाण ठेवला आहे. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे विचार आत्मसात करा अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
आमच्या हिंदूंवर अतिरेकी हल्ले होत असतील तर पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यावर आम्ही कारवाई करू असं राऊत बोलेल का? ते बोलणार माहीत मात्र त्यांना चोख उत्तर मोदी साहेब, शहा साहेब देतील असा विश्वास यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.
उबाठाला महाविकास आघाडीत किती दिवस ठेवायचं हे आम्ही ठरवू अशी धमकीच काँग्रेस ने दिल्ली वरून दिली आहे.मात्र हिम्मत असेल तर मुंबई पदवीधर ची जगा लढवा.काँग्रेस ला कोकण पदवीधर मतदार संघ दिला आहे कारण उबाठा ला आपले कोकणातील अस्थित्व संपले हे माहीत आहे.
370 कलम हटविले त्यामुळे काश्मीर मध्ये किती शांतता आहे हे संजय राऊत यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत जाऊन बघावं.आता त्याठिकाणी उरलेल्या चार अतिरेकी टाळक्यांना मोदी साहेब या वेळी धडा शिकवतील.
रोज सकाळी 420 असलेल्या भ्रष्टाचारी संजय राऊत या माणसाला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या माती मारलेला आहे.त्याला आधी थांबवा अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली.पालतू कुत्र्या प्रमाणे तुझ्या मालकाला वापरलं जातंय त्यावर बोल.मागच्या दरवाजातून येणाऱ्यांना निवडणूक कधीच कळणार नाही.
30 ते 31 जागा पाकिस्तान चा झेंडा फडकवून जिंकलेल्या आहेत याचा जल्लोष पाक मद्ये जास्त झाला.उद्धव ठाकरे चा नागरी सत्कार पाकिस्तान मध्ये होईल.याचे नवल वाटायला नको.
सर्वात मोठा हप्ता खोर संजय राऊत आणि त्याचा मालक आहेत.त्यांनी दुसऱ्यांना हप्ते खोर बोलू नये.डोंबिवली जी घटना घडली अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आमचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण , उदय सामंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. योग्य ती पावल उचलली जाईल.
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा यावं म्हणून आम्ही काम करत आहोत.आम्ही पदासाठी काम करत नाही असे एका प्रश्नांवर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले.