*कोंकण Express*
*कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना बौद्ध वस्ती वाड्यामध्ये वाढता प्रतिसाद*
*भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव*
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना बौद्ध वस्ती वाड्यामध्ये वाढता प्रतिसाद भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव आणि सहकारी साधत आहे जनतेशी थेट संवाद.महाविकास आघाडी संविधान बदलणार असा खोटा प्रचार दलित वस्तीत करत आहे. त्याला अभ्यासपूर्ण आणि सडेतोड उत्तर जिल्हा प्रवक्ते जाधव बौद्ध बांधवात जातं देत आहे.त्यांच्या समवेत कुडाळ मंडळ अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर, ओरोस मंडळ अध्यक्ष विनोद कदम, जिल्हा उपाध्यक्ष गुणाजी जाधव, मालवण अध्यक्ष राजन आंबेरकर, श्रावण जाधव अन्य उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार राणे यांचा प्रचार दौरा बाव, बांबूळी, सरंबळ, साळगाव, तेरसेबांबर्ड, पिंगुळी, गिरगांव, कुसबे, घोटगे, सोनवडे,जांभवडे, माणगाव, आदी गावात करण्यात आला
सरंबळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बौद्ध बांधवाशी संवाद साधत जाधव म्हणाले कि, राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाचा विकास झाला आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला जिल्हा परिषद मध्ये समाजकल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. आरक्षण आणि राणे साहेब यांच्या मुळेच मी जिल्ह्यात काम करू शकलो. विकास फक्त राणे साहेबचं करू शकतात त्यामुळे आपण मोठया संख्येने मतदान करूया. महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव होणार आहे म्हणून ते आपल्या बौद्ध वस्त्या मध्ये जातं संविधान बाबात खोटा प्रचार करत आहेत. संविधान कोणाच्या बापाला ही बदलता येणार नाही. राऊत हे अनेक वर्षे भाजपा युती सोबत होते मग आताच का संविधान बद्दल बोलत आहे. ते दिशाभूल करत आहेत. ते कधीच आपल्या बौद्ध, चर्मकार वाडीत आलेत नाहीत यांची आठवण ठेवा. खासदार निधी मोठया प्रमाणात दिल्याचे माहिती नाही. भाजप न दादर चैत्य भूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका साठी एक हजार कोटी च्या दरम्यान निधी मंजूर करून काम ही प्रगती पथावर आहे.लंडन येथील बाबासाहेब याचं घर जतन करण्याचं काम भाजपा नेच केल. सत्तर वर्षे काँग्रेस देशात सत्तेत होती मग अशी काम त्यांनी का केली नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वोच्च असा भारत रत्न पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग सरकार ने देऊन महामानव यांना सन्मानित केल.या सरकार ला भाजपा ने तेव्हा पाठिंबा दिला होता म्हणजे पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना. म्हणजे बाबासाहेब यांचा सन्मान भाजपा ने केला काँग्रेस ने नाही किंवा शिवसेना उबाठा यांनीही नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी तर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन व बौद्ध समाजाची चेष्टा करत घरात नाही पीठ कशाला हवं विध्यापीठ असं जाहीर विधान केल होतं. हे आपला समाज कधीच विसरणार नाही आणि त्याच उबाठा चे उमेदवार मत मागायला येत आहे. राऊत यांचा मोठया मतांनी पराभव होणार आहे आणि केंद्रीय मंत्री राणे विजयी होणार आहे. या विजयात आपल्या बौद्ध समाज आणि मतदार यांच्या मोठा सहभाग असायला हवं असं आवाहन केल. त्यावेळी उपस्थित समाज बांधवानी आपण विनायक राऊत व त्यांचे सहकारी संविधान बाबत करत असलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नसून राणे यांनाच मतदान करणार आहोत. आमच्या वाडीचा विकास राणे साहेब आणि त्याचे कार्यकर्ते करत आहे, सरपंच कदम यांनी चांगल काम गावात आणि आंबेडकर नगर मध्ये केला आहे. आभार श्रावण जाधव यांनी मानले.