*कोंकण Express*
*श्रीमान योगी प्रतिष्ठान नावाची संस्था काढून
संजय राऊत काळा पैसा व्हाईट करतो*
*आमदार नितेश राणे यांचा घणाघाती आरोप*
*दहा वर्षे या संस्थेचे ऑडिटच झालेले नाही, या संस्थेची चौकशी व्हावी*
*दहा वर्षात कोणी किती देणग्या दिल्या याचीही चौकशी होणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संजय राजाराम राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठान बाबत खर सांगाव.या संस्थेच्या नावे संजय राऊत आणि त्याचा आमदार असलेला भाऊ लोकांकडून पैसे घेतात. या प्रतिष्ठान चे दहा वर्षे ऑडिट झाले नाही. दहा वर्षे कोणी कोणी देणग्या दिल्या आणि ते व्यवहार कसे झाले. याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत.काळा पैसा व्हाईट करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे.संजय राऊत आणि त्यांचं कुटुंब किती ४२० आहे हे समाजासमोर लवकरच येणार असेल्याचे भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ते कणकवली ते पत्रकारांशी बोलत होते.
नितेश राणे म्हणाले संजय राऊत मोदींच्या सभांना प्रतिसाद नाही असं खोट बोलतो. जर शुद्धीत असेल तर एका सभेला पाठवण्याची जबाबदारी माझी.तेथे जाशील तेव्हा मोदी मोदी च्या घोषणा ऐकून ह्याचे कान फाटले नाही तर मी काहीही हरेन असे आव्हान दिले.मोदींजींच्या सभेला प्रचंड गर्दी असते. मोदींमुळे तुझ्या मालकाची झोप उडाली आहे. त्यामुळे तो वेड्या सारखा बोलत आहे.
उद्धव ठाकरेंनी भर मैदानात भिजाव किंवा बाथरूम मध्ये भिजाव मोदी व शाह साहेबांवर बोलण्याऐवढा उद्धव ठाकरे मोठा नाही.शिवसेनेच्या सात बारा वर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव होते. आणि राहणार.उद्धव ठाकरेला या सात बारावर सोनिया गांधी व शरद पवार यांचे नाव लिहायचे होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसेना अखंड ठेवली आहे.
हिंदुत्व सोडून तुझ्या अंगावर उडालेला चिखल ते पहिले साबणाने घास आणि साफ होत काय बघ. नांदेड मध्ये कितीही चिखल म्हणून ओरडा तिकडे कमळ च जिंकणार असा टोला हाणला.
राणे साहेबांच्या बद्धल गैरसमज पसरवायचे चुकीची माहिती द्यायचे काम विनायक राऊत च करत होता. मंत्री दिपक केसरकर व राणे साहेब एकत्र आल्यामुळे विनायक राऊतची झोप उडाली आहे.दिपक केसरकर यांची व्हॅनिटी व्हॅनिटी व्हॅन निवडणुकीत निकाल जाहिरात झाल्यावर दुसऱ्या दिवशी ॲम्बुलन्सचे स्वरूप देऊन विनायक राऊतला मुंबई ला पाठवले जाणार आहे.
प्रियांका गांधींना मोदी साहेब काय बोलले ते समजले नसेल. त्यांनी मोदींजींच भाषण पूर्ण ऐकावं आणि समजून घ्यावं.असे एका प्रश्नावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी सांगितले.