*कोकण Express*
*देशाचे गृहमंत्री अमित शहा ६ फेब्रुवारी रोजी मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
गृहमंत्री ना.अमित शहा यांचे सिंधुदुर्गात भव्यदिव्य स्वागत करणार…!
जिल्हा नियोजनच्या बैठकीत आक्रमक भूमिका दाखविणार – राजन तेली
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हात खडी, वाळू, दारु सगळे, धंदे थाटामाटात चालू आहे. सत्ताधाऱ्यांचे आणि प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.
जनतेच्या भल्यासाठी या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन लढायचे आहे. त्याची रंगीत तालीम जिल्हा नियोजनच्या बैठकीत दिसेल. जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. सांघिक पद्धतीने पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे धोरण राबवणार असल्याचे ठरविण्यात आले असून देशाचे गृहमंत्री अमित शहा हे ६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्या संदर्भात जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.
कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी ३०० उपोषणे झाली आहेत. उपोषणकर्त्याची अवस्था वाईट आहे,आजही काही उपोषणे चालू आहेत.प्रशासन व अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.ओरोसला ९६ लोक उपोषण झाली आहेत. वयस्कर शिवसैनिक शाखा प्रमुखाला न्याय मिळण्यासाठी भांडायला लागत आहे. सत्ताधाऱ्यांनी उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी करत त्या ३०० लोकांना एकत्र राणेंच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे सांगितले. प्रशासनाने डोळेझाक केली असून वृद्धांना,लहान मुलांना घेऊन उपोषणाला बसावे लागले.जिल्हा कुठल्या दिशेला चाललं आहे. हे आगोदर सत्ताधाऱ्यांनी पहावे,हे चुकीचे आहे.याबाबत आम्ही आवाज उठवणार आहोत,असे राजन तेली यांनी सांगितले.
जिल्हा कार्यकारिणी बैठकित खा.नारायण राणे,आ.रविंद्र चव्हान,आ.नितेश राणे यांनी मार्गदर्शन केले आहे. या बैठकीला सर्व नगराध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत बोलताना राजन तेली म्हणाले,अमित शहा म्हणजे देशातील एक विश्वास आहे.त्याचा दौरा सिधुदुर्ग जिल्ह्यासाठी फलदायी ठरणार आहे. ६ फेब्रुवारीला १.५० मिनिटांनी गोव्यावरुन हेलिकॉप्टरमधून पडवे येथे येणार आहेत.उत्सवाचे वातावरण करायचे आहे. देशाचे गृहमंत्री येणार आहेत.त्यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे ,क्रिकेटर प्रणाली खोबरेकर,यशस्वी १४ मंडळ अध्यक्ष , सभापती मनोज रावराणे,देवगड सभापती रवी पाळेकर यांचे या बैठकीत सत्कार करण्यात आले.
तसेच प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय,चित्रताई वाघ या ३१ जनेवारी ते ७ फेब्रुवारी बुथ निहाय कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत.डॉ .निलेश राणे यांचे २८ रोजी आगमन होत आहे.बांदा ते कणकवली जोरदार स्वागत रॅल