तळेरे हायस्कूलचा सिद्धार्थ जठार भालाफेक क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम तर साहिल पवार 600 मी.धावणे द्वितीय

तळेरे हायस्कूलचा सिद्धार्थ जठार भालाफेक क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम तर साहिल पवार 600 मी.धावणे द्वितीय

*कोकण Express*

*तळेरे हायस्कूलचा सिद्धार्थ जठार भालाफेक क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम तर साहिल पवार 600 मी.धावणे द्वितीय*

*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*

कला,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे ता. कणकवली या प्रशालेचा सिद्धार्थ जठार हा भालाफेक क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम तर 600 मी.धावणे प्रकारात साहिल पवार द्वितीय येऊन सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चुणूक दाखविलेले पहिल्या दोन क्रमांकाचे विद्यार्थी व सांघिक खेळातून फक्त पहिल्या क्रमांकाचा गट जिल्हा क्रीडा स्पर्धेत पात्र ठरतो.

प्रशालेचे तालुकास्तरावरील सुयश संपादित विद्यार्थी पुढील प्रमाणे
14 वर्षाखालील मुले/मुली- साहिल पवार 600 मी.धावणे प्रथम,अनुष्का टक्के 400 मी. धावणे,प्रथम गौरंग शिंगे 400 मी.धावणे तृतीय,चैतन्या पवार 200 मी.धावणे तृतीय.
17 वर्षाखालील मुले/मुली- अवधूत तळेकर 100 मी.धावणे प्रथम,राज मांजरेकर 200 मी. धावणे द्वितीय,खुशी पानवाला 200 मी.धावणे द्वितीय,तनश्री दुदवडकर 400 मी.धावणे प्रथम, प्रसन्न तळेकर 400 मी.धावणे प्रथम,सानिका भोगले 800मी. धावणे प्रथम,सिद्धार्थ यठार भालाफेक प्रथम,ऋषिकेश मेस्त्री गोळाफेक द्वितीय,थाळीफेक तृतीय,मुली 4×100 मी.रिले तसेच 4×400मी. रिले प्रथम,4×400मी.रिले मुले प्रथम,4×100 मी.मुले द्वितीय.
19 वर्षाखाली मुले/मुली- अक्षय पवार 400 मी.धावणे प्रथम,4×100 मी.मुले रिले प्रथम, 4×400मी.रिले मुले द्वितीय,जागृती इलावडेकर 100 मी.धावणे तृतीय.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, चेअरमन अरविंद महाडिक,सर्व शाळा समिती सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,आजी व माजी सर्व विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांनी सुयश संपादित विद्यार्थ्यांचे कौतुक केले,तसेच विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!