वैचारिक भिन्नता असलेल्या राजकीय युती मुळे उबाठा नावाची संघटना अस्तित्वात राहणार नाही – आ. नितेश राणे

वैचारिक भिन्नता असलेल्या राजकीय युती मुळे उबाठा नावाची संघटना अस्तित्वात राहणार नाही – आ. नितेश राणे

*कोकण Express*

*वैचारिक भिन्नता असलेल्या राजकीय युती मुळे उबाठा नावाची संघटना अस्तित्वात राहणार नाही – आ. नितेश राणे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जेवढे काँग्रेसवाले सोनिया गांधी आणि गांधी परिवाराचे गोडवे गात नाहीत तेवढा आजकाल संजय राजाराम राऊत त्यांच्या प्रेमात पडलेला आहे. समाजवादी विचारांवर व त्यांच्या विचारांच्या लोकांबरोबर युती करून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा डाव टाकलाय आहे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीनंतर उबाठा नावाची संघटना अस्तित्वात राहणार नाही. याची काळजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी घ्यावी. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलत बोलताना केली. देशाला ज्यांनी राष्ट्रभक्ती शिकवली. तुम्हीं तर काँग्रेसचे तुम्ही पाय चाटत आहात. ज्यांनी पाकिस्तानला मोठं केलं. ज्यांनी अखंड भारत तोडला. त्यानी आम्हाला आणि राष्ट्रीय स्वयंसंघाला राष्ट्रभक्तीचे धडे देऊ नये. आरएसएस आहे म्हणून आपला देश एक संघ आहे. म्हणून उद्या अखंड भारत निर्माण होणार म्हणून जेवढे आभार राष्ट्रीय स्वयंसंघाचे मानले पाहिजे तेवढे कमी आहेत, असेही ते म्हणाले.
जगातला सर्वात मोठा शहाणा कोण असेल तर विनायक राऊत. येत्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये त्यानी आपला शहाणपणा मतदार संघांमध्ये दाखवला तर मतदार संघातील लोकांना कळेल की, सिंधुदुर्ग – रत्नागिरीला एक तरी खासदार उरला आहे. तसही आजकाल सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत मातोश्रीवर चहा देतानाच दिसून येत आहेत. विनायक राऊत यांना ज्या काही टीका टिपण्या करायच्या आहेत त्या २०२४ च्या निवडणुकीपर्यंत कराव्या. २०२४ नंतर त्यांना जे काय आहे ते जनता दाखवून देईल.
काल मीरा बोरणकर यांची इंटरव्यू झाली. त्या इंटरव्यू मध्ये त्यांनी एक खुलासा केला. त्या व्हिडिओची क्लिप आ. नितेश राणे यांनी पत्रकारांसमोर सादर केली. दरम्यान उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात दंगली घडवण्यामध्ये अग्रक्रमांकावर आहेत. म्हणून उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी वारंवार करत असल्याचे आ. राणे म्हणाले.
इंटरव्यूमध्ये बोलताना मीरा बोरणकर म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याविरुद्ध पोलीस खात्याकडे सगळे टेक्निकल पुरावे होते. जी दंगल पुण्यामध्ये भडकवली त्याचे कॉल रेकॉर्डिंग व पुरावे पोलिसांकडे होते. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर म्हणजे कोण ? तर हा उद्धव ठाकरे, असा घनाघात देखील श्री. राणे यांनी केला.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव आजही आहेत. मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरे यांचे आदेश होते की, महाराष्ट्रात दंगल घडवा. याबाबतची चौकशी झालीच पाहिजे. मीरा बोरणकर यांनी जी काही सत्य माहिती सांगितली याचा अर्थ असा होतो की यामध्ये उद्धव ठाकरे यांचा हात होता. राम मंदिर कडे जाताना दंगली घडतील असं भाषण उद्धव ठाकरे वारंवार करत आहेत. १३ ऑगस्ट २००४ च्या घटनांनंतर आता दुसरा पुरावा देखील समोर आलाय. माजी पोलीस कमिशनर सांगतात की, आपल्याकडे सगळे सायंटिफिक पुरावे होते. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांचा हात या दंगली घडवण्यामध्ये आहे. यामध्ये त्यांची चूक नाही. पण ज्या उद्धव ठाकरेंनी आदेश दिले त्यांचे हे काम करतात. त्यांचे नार्वेकर खाजगी सचिव आहेत. त्या उद्धव ठाकरेची चौकशी झाली पाहिजे. मागील दीड – दोन वर्ष ज्या दंगली घडल्या किंवा अयोध्येच्या दिशेने राम मंदिरकडे जाणाऱ्या रामभक्त यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं तर त्याचे जबाबदार उद्धव ठाकरे असतील.
समाजवादी विचार किती प्रभावी आहेत, हे राऊत रोज टेप रेकॉर्डरसारख सांगत बसतात. त्यांना मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे कळलेच नाही. ज्यांनी बाळासाहेब व शिवसेनेची जडणघडण कशी झाली हे बघितले नाही. जॉर्ज फर्नांडिस व मृणाल गोऱ्हे हे बाळासाहेबांबरोबर युती करण्याचे टाळत होते. त्या जॉर्ज फर्नांडिस आणि त्याच मृणाल गोऱ्हेबद्दल हा गोडवे गात असताना दिसतो. ती माहिती देखील बाळासाहेबांनी स्वतः च्या एका इंटरव्ह्यूमध्ये दिलेली होती. अजित पवारांवर उबाठा आणि काँग्रेसचे काही लोक टीका करत आहेत. ते जर तेव्हा महाविकास आघाडीच्या काळात पुस्तक रिलीज झालं असतं तर तेच अजित पवार वाईट असते काय ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
उबाठा सेनेची नवीन कार्यकारिणी ही आमच्यासाठी फायदेशीर आहे. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेता यांना त्या कार्यकारणी मध्ये जागा नाही. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ – मालवणचे आमदार म्हणून मिरवणारे आ. वैभव नाईक हे आम्हाला जिकडे – तिकडे अडवतात. मात्र आताच्या घडीला वैभव नाईक यांना साध उपनेतापद देखील या कार्यकारीणीमध्ये दिले गेलेले नाही. वैभव नाईक यांना महाविकास आघाडी सरकार असताना देखील कोणतही मंत्रिपद दिलेलं नाही, आणि आता पक्षाच्या कार्यकारिणीत देखील समाविष्ट करून घेतलेलं नाही. हेच निष्ठावंत राहिलेल्या पक्षातील स्थान आहे. त्यामुळे त्यांनी भाजपा आणि राणेंवर किती टीका करावी याचा थोडा विचार करावा. जर इज्जत दिली जात नसेल तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही इज्जत करायची का? असाही सवाल आ. राणे यांनी वैभव नाईक यांना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!