*कोकण Express*
*इनोव्हा,फॉर्च्यूनर गाडीचे नवीन मॉडेल आलेय,त्यासाठी रस्त्यांचा मुद्दा घेवून आंदोलने*
*उबाठा सेनेवर आमदार नितेश राणे यांचा घणाघात*
*महामार्ग चौपदरीकरणावेळी अशाच मिळवल्या होत्या गाड्या*
*हे तर मंत्री रवींद्र चव्हाणांसोबत नमकहरामी आहे; पारकर,रावराणे यांना सुनावले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
एकीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरगुती कार्यक्रमात मित्र म्हणून हजर राहायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच खात्यावर टीका करायची ही रवींद्र चव्हाण यांच्याशी नमकहरामी असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी संदेश पारकर, अतुल रावराणे यांची नावे न घेता लगावला. तळेरे गगनबावडा रस्त्याच्या दुरावस्थेवरून उबाठा शिवसेना पदयात्रा काढणार आहे याबद्दल पत्रकारांनी विचारले असता आमदार नितेश राणे यांनी “मार्केटमध्ये इनोव्हा कार चे आणि फॉर्च्यूनर गाडीचे नवीन मॉडेल आले आहे काय ? असा खोचक सवाल करत जेव्हा मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होते त्या वेळेला असेच फॉर्च्यूनर आणि इनोव्हा गाडीचे मॉडेल आलेले होते.तेव्हा त्या गाड्या कुठे वाटला गेला, कोणी कोणी घेतल्या हे तुम्हाला सर्वांना माहिती. आत्ताचे हे आंदोलन त्यासाठीच आहे अशी टीका उबाठा सेनेने पदयात्रा काढण्याच्या दिलेल्या इशारावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी केली.
तरळे गगनबावडा रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीनजी गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण हे स्वतः लक्ष घालत आहेत. 238 कोटी या रस्त्यासाठी वर्ग झालेले आहेत. त्यामुळे पाऊस संपताच या रस्त्याचे काम सुरू होईल असा असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले.