*कोकण Express*
*कणकवली कॉलेजमध्ये युवा महोत्सव*
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ विभाग युवा महोत्सव दिनांक 17 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक १४ रोजी युवा महोत्सव नियोजन बैठक प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीसाठी पर्यवेक्षक प्रा. अरुण चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे , सर्व सदस्य व वरीष्ठ-कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते.
युवा महोत्सवांमध्ये लोकनृत्य, एकेरी नृत्य, निबंध, वक्तृत्व, वाद-विवाद, समूह नृत्य, गायन, रांगोळी, पोस्टर मेकिंग, मेहंदी, पेंटिंग अशा विविध कला प्रकारांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यात कलात्मक विकास व्हावा, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विजयी स्पर्धकांना तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. महोत्सव प्रसंगी विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या माजी विदयार्थी कालावंतांचा सन्मान
सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाचे उद्घाटन १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०. ३0वाजता महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहामध्ये होणार आहे. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संदिप साळुंखे व सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या महोत्सवामध्ये 200 कलावंत विद्यार्थ्याचा सहभाग आहे अशी माहिती प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. अरुण चव्हाण व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे यांनी केले आहे.