*कोकण Express*
*जिल्ह्या चे प्रमुख केंद्र होऊ पाहणार्यां शहरात चाललय काय, तलाठी आणि रजिस्ट्रेशन कार्यालयात बोगस कामांचा सुळसुळाट*
*सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा संतप्त सवाल*
शहर जसे झपाट्याने वाढत चालले तसे शहरात बोगस कामांचा सुळसुळाट सुध्दा वाढत चाललाय, आज जिल्ह्या चे मुख्य केंद्र होऊ पाहणार्यां शहरात तलाठी कार्यालय आणि रजिस्ट्रेशन कार्यालयात ( सातबारा नोंद / बक्षीस पत्र /खरेदी खत ) या सारख्या कामात कोणतीही आवश्यक कागदपत्रे न घेता राजरोस खुले आले आम बोगस कामे केली जात आहेत, सुशिक्षित व्यक्ती च्या बाबतीत असे घडत असेल तर मग विचार करा अशिक्षित व्यक्तींची किती फसवणूक होत असेल, गोरगरिबांनी आपली वडिलोपार्जित जमीनजुमला संभाळून ठेवलाय तो ❓ अशा बेजबाबदार शासकीय कर्मचार्यांनी बोगस कामे करून, कुणाच्या हि घशात घालण्यासाठी ❓ बोगस रजिस्ट्रेशन च्या जिवावर तलाठी कार्यालयात बोगस सातबारा नोंद केल्या जात आहेत, या सर्व आणि अशा सर्वच क्षेत्रात चालत असलेल्या असंख्य बोगस कामांची दखल कोण घेणार आहे की नाही