*कोकण Express*
*शिवसेना उबाठा पक्षाची रस्त्याच्या कामासाठी गगनबावडा ते तळेरे पर्यंत पदयात्रा*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती ; ३० ऑक्टोंबरला रस्त्याची दुरवस्था झाल्याने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याच्याची दुरवस्था झाली आहे. गगनबावडा, करुळ, तळेरे या रस्त्याची पाहणी करत शिवसेनेच्या वतीने पदयात्रा ३० ऑक्टोंबर रोजी काढण्यात येणार आहे. ३० ऑक्टोंबरला रस्त्याची दुरवस्था झाल्याने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना उपतालुकाप्रमुख उत्तम लोके आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
या पदयात्रेत शिवसेना आ. वैभव नाईक, माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, निलम पालव, सुशांत नाईक आदी पदाधिकारी
सहभागी होणार आहेत. या गगनबावडा, करुळ, तळेरे या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची दुरवस्था आहे त्यावर लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम घेणार आहोत. यापूर्वी शिवसेना कार्यकत्यांच्या वतीने वैभववाडी मध्ये रस्ता रोको आंदोलन छेडण्यात जाले होते. प्रशासनातील अधिकारी यांना जाब विचारला होता. आतापर्यंत कुठलाही परिणाम या प्रशासनावर झाला नाही. खराब रस्त्यातून गणेश चतुर्थी झाली. पर्यटक, व्यापारी, रहिवाशी, वाहनचालक, रिक्षा चालक अन्य वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्राशी आपला व्यापारी संबंध आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत