*कोकण Express*
*कणकवली तहसीलदारांकडे अतिरिक्त साझाचा कार्यभार असलेल्या तलाठी कार्यालयाच्या चाव्या जमा*
*रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने घेतलेल्या आंदोलत्मक भुमिकेला पाठिंबा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने विभागीय आयुक्त कोकण यांना दि. २५ ऑगस्ट २०१३ रोजी दिले होते. दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना प्रमाणे कणकवली तालुका तलाठी संघ सदर आंदोलनात सहभागी घेत असल्याचे निवेदन कणकवली तलाठ्यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले. तसेच अतिरिक्त साझाचा कार्यभार असलेल्या तलाठी कार्यालयाच्या चाव्या जमा केल्या आहेत.
दिलेल्या निवेदनात तालुक्यातील अतिरिक्त साझाचा कार्यभार असलेल्या तलाठी कार्यालयाच्या चाव्या जिल्हा संघाचा पुढील निर्णय होईपर्यंत सोबतच्या यादी प्रमाणे जमा करण्यात येत आहे. या कालावधीत तलाठी संवर्ग अतिरिक्त साझा मधील नैसर्गिक आपत्ती व निवडणूक विषयक कामे, ही आपल्या नियमित तलाठी साझाचा कार्यभार सांभाळून करतील. सदरच्या चाव्या जमा करून घेऊन संघाला सहकार्य । करावे, असे म्हटले आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष विरेंद्र रासम उपाध्यक्ष प्रवीण लुडबे, सचिव गणेश गोडे, संघटक तथा मंडल अधिकारी दत्ता डाके, महिला प्रतिनिधी तलाठी सुवर्णा कडुलकर आदींसह तालुक्यातील तलाठी उपस्थित होते.