*कोकण Express*
*फोंडाघाट नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रोत्सव*
*नवदुर्गा युवा मंडळांकडुन सलग २१ व्या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन*
*देवीची प्रतिष्ठापना करुन विविध कार्यक्रम*
फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर सार्वजनिक नवरात्रोत्सवानिम्मित देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन शारदीय नवरात्रारंभ रविवार दि.१५ ऑक्टो. २०२३ ते विजयादशमी दसरा बुधवार दि.२५ ऑक्टो. २०२३ या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, तसेच सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा होणार आहे.
यामध्ये रविवार दि.१५ ऑक्टो. सकाळी १०.०० वा. देवीचे आगमन, देवीची प्रतिष्ठापना, घटस्थापना, पुजा, आरती. सायं.०७:०० वा. कुर्लादेवी प्रासा.भजन मंडळ नवीन कुर्ली यांचे भजन, आरती. रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. सोमवार दि.१६ ऑक्टो. सायं. ०७:०० वा. ह.भ.प.विजय नारायण मेस्त्री व सहकारी यांचा हरिपाठ. रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. मंगळवार दि.१७ ऑक्टो. सकाळी ०९:०० वा. रक्तदान शिबीर तसेच सांय. ०७:०० वा. केळोबा प्रासा. भजन मंडऴ फोंडाघाट याचे भजन,आरती. रात्रौ.०९:०० वा. दांडिया नृत्य. बुधवार दि.१८ ऑक्टो. सायं. ०७:०० वा. पावणादेवी प्रासा. भजन मंडळ पावणादेवी फोंडाघाट बुवा- हेमंत तेली यांचे भजन,आरती. सायं.०८:०० वा. मुलांकरीता विविध सांस्कृतिक कार्यक्रम़,रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. गुरुवार दि.१९ ऑक्टो. सकाळी १०:०० वा. सत्यनारायण महापुजा, सायं. ०४:०० वा. महिलांकरीता हळदीकुंकू, सांय. ०७:०० वा. कुर्लादेवी प्रासा. भजन मंडळ नवीन कुर्ली बुवा- कु. कविता चव्हाण यांचे भजन,आरती. रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. शुक्रवार दि. २० ऑक्टो. सायं.०७:०० वा. लिंगेश्वर प्रासा. भजन मंडळ वाघेरी बुवा- चंद्रकांत गुरव यांचे भजन,आरती. रात्रौ ०८:०० वा. मुलींकरीता विविध सांस्कृतिक कार्यक्रम,रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. शनिवार दि.२१ ऑक्टो. दुपारी १२:३० वा. देवीचा महाप्रसाद, सांय.०७:०० वा. राधाकृष्ण प्रासा. भजन मंडळ फोंडाघाट बुवा- प्रथमेश चव्हाण यांचे भजन,आरती. रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. रविवार दि.२२ ऑक्टो. सायं.०७:०० वा. केळोबा प्रासा. भजन मंडळ फोंडाघाट बुवा- ऋुषिकेश धुरी यांचे भजन,आरती. रात्रौ ०८:०० वा. पंचक्रोषी रेकॉर्ड डान्स व वेशभुषा स्पर्धा,रात्रौ. १०:०० वा. दांडिया नृत्य. सोमवार दि.२३ ऑक्टो. रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य. रात्रौ ०९:०० वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री भुतेश्वर प्रासा. भजन मंडळ खुडी ता. देवगड गुरुवर्य बुवा- श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य बुवा- श्री. संतोष जोईल × श्री. कोटेश्वर नवतरुण प्रासा. भजन मंडळ हरकुळ बु. ता. कणकवली गुरुवर्य बुवा- श्री. प्रमोद हर्याण यांचे शिष्य बुवा- श्री. अभिषेक शिरसाट यांचा २०× २० भजनांचा जंगी सामना. मंगळवार दि.२४ ऑक्टो. सायं. ०४:०० वा. सोने लुटणे, रात्रौ ०९:०० वा. दांडिया नृत्य, रात्रौ ०९:३० वा. कॉमेडी,मिमिक्री आणि जादुगर विक्की यांचे जादुचे प्रयोग. रात्रौ १०:०० वा. बक्षिस वितरण सोहळा व आभार प्रदर्शन कार्यक्रम. बुधवार दि.२५ ऑक्टो. दुपारी ०३:०० वा. देवीची उत्तरपुजा व देवीची आरती व सायं.०४:०० वा. भव्यदिव्य मिरवणुक सोहळा व देवीचे विर्सजन. अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थ व भाविक- भक्तांनी लाभ घेऊन कार्यक्रमांची शोभा वाढवुन सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात येत आहे.