*कोकण Express*
*पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता*
*संशयीताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत दाखल केलेल्या फिर्यादीवरून चाललेल्या खटल्यात आरोपीची संशयाचा फायदा देत मुक्तता करण्यात आली. यात मुक्ततेनंतर आरोपीने फिर्यादीसह खटल्यातील निवडक साक्षीदारांविरुद्ध द्वेषमुलभावनेने फौजदारी कारवाई केल्याने १० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा केलेला दावा सह दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर ओरोसचे न्यायाधिश एस. डी. चव्हाण यांनी सुनावणीअगोदरच रद्द केला. साक्षीदारांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
पोस्को अंतर्गत खटल्यातील आरोपी विनोद शिवाजी चौगुले याची पोस्को विशेष न्यायालयाने संशयचा फायदा देत मुक्तता केली होती. परंतु, न्यायालयाने अल्पवयीन फिर्यादीने दिलेलीफिर्याद व दाखल खटला खोटा असल्याचे निष्कर्ष काढलेले नव्हते. मात्र, निर्णयानंतर आरोपीने आपल्याविरूद्ध फिर्यादी व साक्षीदारांनी संगनमत करून कटरचून द्वेषमुलभावनेने खोटा खटला दाखल केला असे नमूद करून समाजात झालेल्या अब्रुनुकसानीबाबत ७ लाख आणि शारिरीक मानसीक त्रासाबाबत २ लाख व खटल्याच्या खर्चाबाबत १ लाख अशी १० लाखांची भरपाई मागितली होती. यातील साक्षीदारांच्यावतीने सदरचा खटला हा कायदेशिर तरतूदींच्या विरुद्ध असून पिडीतेची ओळख उघड करणारा असल्याने, शिवाय त्याला कोणतेही कारण घडलेले नसल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीआधीच साक्षीदार, प्रतिवादींची मागणी मान्य करून न्यायालयाने सदरचा खटला रद्द केला.