किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप डीपीला उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ; एकच खळबळ, वाचा नेमकं काय घडलं?

किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप डीपीला उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ; एकच खळबळ, वाचा नेमकं काय घडलं?

*कोकण Express*

*किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप डीपीला उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ; एकच खळबळ, वाचा नेमकं काय घडलं?*

*मुंबई :*

उद्योगमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू उदय सामत यांचे बंधू किरण सामंत यांनी व्हॉट्स अॅपवर ठेवलेल्या डीपीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. किरण सामंत यांनी डीपीला ठाकरे गटाची निशाणी मशाल चिन्ह ठेवलं आहे. पण चर्चा सुरू होताच सामंत यांनी मशालीचा डीपी बदलला आहे. यावर किरण सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

किरण सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहेत. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पण, किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पेटती मशाल निशाणीचा डीपी व्हॉट्सअॅपवर लावला होता. तसेच, ‘जो होगा देखा जायेगा अस स्टेटसवर लिहिल होतं.

याबद्दल किरण सामंत म्हणाले, “मी डीपी ठेवला होता. याला काही कारण होती. त्यावर योग्यवेळी बोलेन. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला.”

‘जो भी होगा देखा जागेया’ असं स्टेटस लिहिण्याबाबत प्रश्न विचारल्यावर किरण सामंत यांनी म्हटलं, ‘शंभर टक्के सर्व गोष्टीला आपली तयारी होती. फक्त उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे स्टेटस मागे घेतलं. माझ्यामुळे उदय सामंत यांच राजकीय करिअर खराब होऊ नये.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!