*कोकण Express*
*कळसुली इंग्लिश स्कूलच्या रुद्र गुरव याने नॅशनल स्तरावरील मॉडेल मेकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला*
*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*
कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली मधील इयत्ता आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार रुद्र शिवाजी गुरव याने नुकत्याच पुणे येथे झालेल्या नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल स्तरावरील मॉडेल मेकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
नॅशनल स्टेम प्रोग्रॅम ही एक कंपनी असून तिच्या मार्फत मिनी सायन्स सेंटर असणाऱ्या शाळांमधील उपकरणे, प्रोजेक्ट तयार करण्यात आलेले आहेत. या कंपनीमार्फत मिनी सायन्स सेंटर असणाऱ्या शाळांमधून मॉडेल मेकिंग स्पर्धा आयोजित केली जाते.यापूर्वी तो जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला आला होता.
रुद्र गुरव व त्याच्या पालकांचे त्याला मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री. चव्हाण व मुख्याध्यापक व्ही.व्ही.वगरे यांचे संस्था पदाधिकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ,पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.