*कोकण Express*
*श्रीमती सुनिता तुकाराम सावंत यांचे निधन*
*कणकवली / प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील जांभवडे – भूतवड येथील रहिवासी श्रीमती. सुनिता तुकाराम सावंत (87) यांचे गुरुवार 10 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
तत्कालीन खरेदी कणकवली खरेदी विक्री संघाचे तसेच मराठा सहकारी बँक मुंबईचे माजी संचालक व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते कै. तुकाराम सावंत यांच्या त्या पत्नी तर कणकवली महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे लिपिक अनिल उर्फ आप्पा राणे यांच्या त्या सासू होत.