*कोकण Express*
*सिंधुदूर्गात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू…*
*रविद्र चव्हाण; सावंतवाडीतील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमुळे तरुणाईत नवचैतन्य…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आहे याचाच फायदा घेवून येथिल युवकांच्या हाताला काम मिळाले पाहीजे सिंधूदूर्गातज रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहीजेत यासाठी काही करता येवू शकते का या विषयावर आता चर्चा केली जाणार आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी येथे दिला. दरम्यान एवढ्यावर न थांबता जिल्ह्याचा सर्वागिण विकास झाला पाहीजे प्रत्येक गावाला वेगळी ओळख मिळाली पाहीजे यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. त्यासाठी संदिप गावडे सारख्या तरुण व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घ्यावा असे ही ते म्हणाले. भाजपा युवा नेते संदिप गावडेंच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेच्या समारोप प्रसंगी श्री. चव्हाण यांनी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन केले ते म्हणाले या ठीकाणी मी १५ ऑगस्टला जिल्ह्यात येणार होतो परंतू शासन स्तरावर अचानक जबाबदारी बदलण्यात आल्यामुळे मी अन्य ठीकाणी गेलो त्यामुळे या स्पर्धेला येवू शकलो नाही याची खंत आहे.
परंतू अशा स्पर्धांच्या माध्यमातून नव्याने स्पर्धक घडले पाहीजेत. ते पुढे म्हणाले मैदानी खेळाला महत्व आहे. त्यापेक्षा फुटबॉलला महत्व आहे. या खेळातील खेळाडुंना राष्ट्रीय स्तरावर चमकता आले पाहीजे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. संदिप गावडे व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेवून सुरू केलेला हा उपक्रम अशाच पध्दतीने दरवर्षी चालविला जावा आणी त्यातून अनेक खेळाडू घडावेत शुभेच्छा मी त्यांना देतो. भविष्यात खेळा बरोबर येथिल युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे त्यादृष्टीने या ठीकाणी काही करता येवू शकते या साठी आमचे प्रयत्न असणार आहे. ते पुढे म्हणाले नुसती फुटबॉल स्पर्धा घेवून या ठीकाणी गावडे थांबले नाहीत तर त्यांनी सावंतवाडी फुटबॉल क्लब सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा स्तूत्य आहे. या क्लबच्या माध्यमातून भविष्यात अनेक खेळाडू घडावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तसेच हीरण्यकेशी नदीचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भविष्यात त्याला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे आणि या अभियानात हीरण्यकेशी नदीच्या काठावर असलेल्या गावातील ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे चव्हाण यांनी आवाहन केले. त्याचबरोबर यावेळी श्री. गावडे यांच्या माध्यमातून गेळेगावचा आदर्श बंड या कोल्हापूर संघात खेळणाऱ्या विद्यार्थ्याला क्रिकेट किट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले सिंधुदूर्ग जिल्ह्यात जास्त प्रचलित नसलेला फुटबॉल सारखा खेळ घेवून येथिल नवोदीत खेळाडुंना प्रोत्साहन देण्याचे काम संदिप गावडे व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे. केवळ स्पर्धा म्हणून नाही तर या खेळातून नवोदीत खेळाडू घडावेत यासाठी आश्वासक पध्दतीने याकडे पाहीले भविष्यात जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकला जावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला संदिप गावडे यांनी जोड दिली हे महत्वाचे आहे पक्ष म्हणून आम्ही कायम पाठीशी आहोत
यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत,मंदार कल्याणकर, पंकज पेडणेकर, राजू राऊळ, निलेश तेंडुलकर, विनय केनवडेकर, श्रीपाद तवटे,हळदणकर, दिलीप भालेकर,
समर्थ राणे, परिक्षित मांजरेकर, गुरुनाथ कासले, गणेश कुशे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, रुपेश शिरा अमोल टेंबकार आदी उपस्थित होते.