*कोकण Express*
*सावंतवाडीतील मान्सून चषकाचा “कोल्हापुरचा शिवस्पोर्टस संघ” मानकरी…*
*गोव्याचा “डॅडीज लव्ह संघ” उपविजेता; संदिप गावडेंच्या पुढाकारातून आयोजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
संदिप गावडे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा मानकरी कोल्हापुर येथील “शिव स्पोर्टस संघ” ठरला तर पारसे गोवा येथील “डॅडीज लव्ह” या संघाने उपविजेतापद पटकावले. येथील जिमखाना मैदानावर २ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून नयन सुर्यवंशी याला तर शिस्तबध्द संघ म्हणून शिवस्पोर्टस कोल्हापुर या संघाला गौरविण्यात आले.
भाजपाचे युवा नेते संदिप गावडे यांच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा समारोप काल रात्री उशिरा झाला. २ दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी तब्बल ३० संघ सहभागी झाले होते. यात गोव्यातील संघासह कोल्हापुर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघाचा समावेश होता.या स्पर्धेचे बक्षिस वितरण संदिप गावडे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर, कोलगावचे माजी सरपंच संदिप हळदणकर, दिलीप भालेकर, डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेेंबकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, परीक्षित मांजरेकर,गुरुनाथ कासले,समर्थ राणे, अनिकेत आसोलकर, चैतन्य सावंत, सचिन मोरजकर, ओंकार पुरलकर, हेमंत पांगम, किसन धोत्रे, अभिषेक लाखे, स्वरुप कासार, शुभम सावंत, रोहन खोरागडे, साई हनपाडे, ओम टेंबकर, सार्थक कोलवणकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.गावडे म्हणाले, या ठिकाणी युवकांना डोळ्यासमोर ठेवून ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. त्याला सावंतवाडीसह अन्य फुटबॉल प्रेमींनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. याबद्दल मी सावंतवाडीकर आणि फुटबॉल प्रेमींचे आभार मानतो. या ठिकाणी अशाच प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी भरविल्या जाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेचे समालोचन दिप आरोंदेकर, सचिन सावंत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. या स्पर्धेचे पंच म्हणुन तेजस नागवेकर आदींनी काम पाहिले.