*कोकण Express*
*कणकवली अर्बन निधी लिमिटेड बँकेच्या वतीने २० ऑगस्ट रोजी वृक्षारोपण*
कणकवली अर्बन निधी लिमिटेड या बँकेच्या वतीने आयडियल इंग्लिश स्कूल अँड जुनीअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे रविवार दिनांक २०/०८/२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता हा कार्यक्रम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.दीपक बेलवलकर ,हळवे कॉलेज दोडामार्गचे प्रा.डॉ.सुभाष उर्फ बापू सावंत, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे श्री.बुलंद पटेल, प्रा.निलेश महेंद्रकर, श्री.मोहन सावंत, सौ. शितल सावंत व सर्व संचालक मंडळ, कणकवली अर्बन निधी बँकेचे श्री.रंजन चव्हाण, श्री.प्रीतम पारकर व सर्व संचालक व सल्लागार मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये झाडे लावा झाडे जगवा हा विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीचा सामाजिक उपक्रम राबवला जाणार आहे, यावेळी ५० हून अधिक फळझाडे आणि फुलझाडे लावली जाणार आहेत अशी माहिती कणकवली अर्बन बँकेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे यांनी दिली आहे.