*कोकण Express*
*कावळा करतो काव!काव!!जन्माला येऊन एक तरी झाड लावं!*
*कासार्डेत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षदिंडी*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कावळा करतो काव! काव! जन्माला येऊन एक तरी झाड लावं!! माकडा, माकडा हुप हुप! झाडे लाऊ खूप खूप!! झाडे लावा! झाडे जगवा!अशा अनेक घोषणांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना आणि इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी कासार्डेतील परिसर दणानून सोडला.औचित्य होते सामाजिक वनीकरण सिंधुदुर्ग व वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण कणकवली यांच्यावतीने ‘वनमहोत्सवा’ निमित्त कासार्डेत जनजागृतीसाठी काढलेल्या वृक्षदिंडीचे.
कासार्डे माध्यमिक विद्यालयामार्फत आयोजित या जनजागृती वृक्षदिंडीचे उद्घाटन कासार्डे शिक्षण संस्थेच्या स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांच्या शुभहस्ते पालखीत तुळशीचे रोप ठेवून झाले.
याप्रसंगी खारेपाटणचे वनपाल शिवाजी इंदूलकर,
सांगवेच्या वनरक्षक राजश्री शेवाळे, विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर, प्र.पर्यवेक्षिका सौ.बी.बी.बिसुरे, कासार्डे विद्यालयचे राष्ट्रीय हरित सेनेचे विभाग प्रमुख ए.ए.कानेकर,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,शिक्षिका सौ.डी.डी. मिठबांवकर, ग.शि.कणकवली चे विषय तज्ञ सचिन तांबे, शिक्षक सागर पांचाळ,यशवंत परब व इतर शिक्षक उपस्थित होते.
कासार्डे हायस्कूल मधुन निघालेली ही वृक्षदिंडी जनजागृतीसाठीपर लिहलेले फलक आणि बॅनर हातात घेऊन तसेच पालखीत झाडांची रोपे ठेवून घोषणा देत सहभागी झाले होते.
आकर्षक पद्धतीने सजवलेली वृक्षदिंडीतील पालखीचे भोई झालेले विद्यार्थी मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन कासार्डे तिठा पर्यंत व त्याठिकाणाहुण पुन्हा जनजागृतीपर घोषणा देत कासार्डे विद्यालयात आले.
त्यानंतर विषय तज्ञ सचिन तांबे यांनी विद्यार्थ्यांना’
वृक्षारोपन व पर्यावरणा बाबत शपथ’ दिली.
दरम्यान कार्याध्यक्ष संजय पाताडे ,सचिन तांबे,
शिवाजी इंदूलकर व ए.ए.कानेकर यांच्या हस्ते याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. सदरच्या रोपांचे जतन करण्याचे आणि आणि संवर्धनाचे आवाहन याप्रसंगी संजय पाताडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
या वृक्षारोपण जनजागृतीपर ‘वृक्षदिंडीत’ स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, खारेपाटणचे वनपाल शिवाजी इंदूलकर,सांगवेच्या वनरक्षक राजश्री शेवाळे, विभागप्रमुख ए.ए.कानेकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,शिक्षिका सौ. डी.डी.मिठबांवकर राष्ट्रीय हरीत सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
शेवटी ए.ए. कानेकर यांनी आभार मानून वृक्षदिंडीची सांगता केली.