*कोकण Express*
*कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट उद्या राजीनामा देणार*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले असून हा राजीनामा उद्या, गुरुवार १७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष यांच्याकडे देणार आहेत.
कुडाळ नगरपंचायतीमध्ये कॉंग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्याबद्दल दीड वर्ष उलटून गेले आहे. या सत्तासंघर्षामध्ये कॉंग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकाना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद सव्वा वर्षांसाठी देण्यात आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांना उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदाचा कालावधी दीड वर्षांवर गेला. त्यामुळे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. उद्या, १७ ऑगस्ट रोजी मंदार शिरसाट आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या किरण शिंदे आणि उदय मांजरेकर यांच्यापैकी कोणत्या नगरसेवकाला संधी मिळते. याकडे लक्ष लागून राहिले आहे.