आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कासार्डे येथे नोकर भरती पूर्व कार्यशाळेचे आयोजन

आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कासार्डे येथे नोकर भरती पूर्व कार्यशाळेचे आयोजन

*कोकण Express*

*आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कासार्डे येथे नोकर भरती पूर्व कार्यशाळेचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कासार्डे येथे दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद भरती व तलाठी भरती बाबत विनामुल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुखवक्ते म्हणून करिअर मेकर्स अकॅडमी मुंबईचे संचालक प्रा. संजय मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील पदवीधर युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासना मार्फत जिल्हा परिषद व तलाठी भरती जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात 143 पदांसाठी ही भरती होणार आहे. अनेक वर्षापासून नोकरीच्या शोधात असणा-या उमेदवारांसाठी ही भरती आशेचा किरण ठरणार आहे.

या कार्यशाळेत अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान याविषयी विनामुल्य सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार व रविवार रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे. कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे तिठा या ठिकाणी ही कार्यशाळा संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!