*कोकण Express*
*जिल्हा बँक तळेबाजार शाखा एटीएमचे नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तळेबाजार शाखा नविन एटीएम चे उद्घाटन आमदार बैंक संचालक नितेश राणे यांच्या हस्ते गुरूवार १७ ऑगस्ट २०२३ रोजी सायकाळी वाजता करण्यात होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार तथा बँकेचे माजी संचालक अजित गोगटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बैंक संचालक प्रकाश बोडस आदी मान्यावर उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, ग्राहक ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असा आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.