सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता कामे मॅनेज करतात

सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता कामे मॅनेज करतात

*कोकण Express*

*सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता कामे मॅनेज करतात*

*माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांचा आरोपनियमबाह्यरित्या निविदा अपात्र ठरविण्यात आली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्यामार्फत अनागोंदी कारभार सुरू आहे. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण दाखवत निविदा अपात्र ठरविण्यात आली. मात्र याच कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, एवढेच नव्हे तर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जि. प. सिंधुदुर्ग यांनी त्यास ठेकेदाराला विविध कामे दिलेली आहेत. या साऱ्याचा विचार करता कणकवली येथील कार्यकारी अभियंता कामे मॅनेज करत आहेत, याच नव्हे तर अशा प्रकारे अनेक प्रकारची कामे ते मॅनेज करत असून त्याचा पोलखोल लवकरच केला जाईल असा इशारा कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी दिला आहे.

सावंतवाडी येथील मक्तेदार चंद्रकांत बिले यांनी सोनवडे तर्फ कळसुली येथील शाळा इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण केले नाही या कारणास्तव त्यांना काळ्या यादीत टाकल्याचे पत्र जि.प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने ३१ ऑक्टोबर रोजी काढले.

ठेकेदाराने त्यानंतर काम पूर्ण केले व त्याचे अंतिम देयकही झाले. असे असताना ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण सांगत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्व गोड यांनी करजे कुंभारवाडी सातोसेवाडी नारकरवाडी नदीवर साकव बांधणे हे काम त्या ठेकेदाराची निविदा ओपन न करताच नाकारले, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकामच्या कामाबाबत स्वतंत्र नोंदणी असतानाही जिल्हा परिषदेच्या कामासाठीचे निकष सार्वजनिक बांधकाम विभागाने लावून नियमबाह्यरित्या निविदा अपात्र ठरविण्यात आली. विशेष म्हणजे याच कालावधीत म्हणजे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काळ्या यादीत टाकल्याचे पत्र दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी जलजीवन मिषांची कामे, पाटबंधारे विभाग अंबडपाल तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांनी याच ठेकेदाराला निविदा स्वीकारून कामे दिलेली आहेत.. या सान्याचा विचार करता कार्यकारी अभियता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली हे जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांतील काही मंडळींना हाताशी धरून कामे मॅनेज करत आहेत. तसेच कामांमध्ये आपण काटेकोर असल्याचे सांगत असले तरीही अनेक निविदा चुकीच्या पद्धतीने ओपन करणे रक्कम वाढविणे असे प्रकार करत आहेत. त्यांच्या सुरू असलेल्या या कार्यपद्धतीबाबत आम्ही लवकरच पोल खोल करू.. त्यांची ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा श्री पारकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!