महाविद्यालयांनी समाजपुरक उपक्रमास प्राधान्य द्यावे – डॉ.शिल्पा सप्रे

*कोकण Express*

*महाविद्यालयांनी समाजपुरक उपक्रमास प्राधान्य द्यावे – डॉ.शिल्पा सप्रे*

*कणकवली महाविद्यालयात ‘नॅक’ कार्यशाळा…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आधुनिक काळात महाविद्यालयांमध्ये केवळ वर्गातीलच गुणवत्तेला प्राधान्य न देता वर्गाबाहेरील गुणवत्ता जोपासणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी महाविद्यालयातील सर्व घटकांनी एकत्र येत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाला पूरक अशा उपक्रमाला प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन
डीबीजे महाविद्यालय चिपळूण येथील इंग्रजी विभाग प्रमुख तथा तज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. शिल्पा सप्रे यांनी व्यक्त केले.
कणकवली महाविद्यालयात नॅक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले उपस्थित होते.
डॉ.शिल्पा सप्रे यांनी याप्रसंगी महाविद्यालयात दर पाच वर्षांनी होनाऱ्या नॅक मुल्यांकनाअंतर्गत येणाऱ्या १ ते ७ क्रायटेरीऑन मध्ये राबवावयाचे उपक्रम व त्यांचे दस्ताऐवजीकरण कशा पद्धतीने करावे याबाबत सोदाहरण, सविस्तर व अत्याधुनिक पद्धतीची माहिती दिली. तर उपस्थित प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उद्बोधक मार्गदर्शन केले.शिक्षणाची संकल्पना आता बदलली असुन आताच्या काळात शिक्षकांबरोबरच पालक, विद्यार्थी, संस्थापक, शिक्षकेतर कर्मचारी,माजी विद्यार्थी, समाजातील वेगवेगळ्या अशासकीय संस्था, स्थानिक समुहाचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.तसेच विद्यार्थी, पालक व समाजातील वेगवेगळ्या स्तरातील घटकांना प्राधान्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रमाणपत्र कोर्सेस, वर्कशॉप,प्रशिक्षण सत्र, क्षेत्र भेटी व प्रकल्प कार्य आयोजित केले पाहिजेत. निश्चित प्रकारचे ध्येय समोर ठेवून प्रत्येक विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बहुउद्देशीय गुणवत्तेला प्राधान्य मिळेल अशा प्रकारचे अभ्यासक्रम पुढील काळात राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्गातील शिक्षणाबरोबरच वर्गाबाहेरील महाविद्यालयांची भूमिका वाढली पाहिजे. समाजात जाऊन विविध उपक्रमशिल संस्था, उद्योग, बाजारपेठा, प्रयोगशाळा, कारखाने, वस्तुसंग्रहालये अशा उपक्रमांना भेटी देऊन प्रत्यक्ष अभ्यास केला पाहिजे. समाजातील सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, ऐतिहासिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांची सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना नेतृत्वगुणांची संधी निर्माण करून दिली पाहिजे‌.तरच पुढील काळात ग्रामीण भागातील महाविद्यालये टिकतील. पुढील काळात ‘छोटी विद्यापीठे’ व ‘विभाग महाविदयालय’ ही संकल्पना अधिक नावारूपाला येईल. त्याची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक महाविद्यालयाने व प्रत्येक महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व सर्व भागधारकांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढे आले पाहिजे. असे विचार प्रा. डॉ. शिल्पा सप्रे यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत डॉ.अनिल फराकटे यांनी प्रमुख
वक्त्यांचा परिचय करून दिला.तर नॅक विभागाचे समन्वयक प्रा. डॉ.बाळकॣष्ण गावडे यानी आभार मानले. या कार्यशाळेस सह समन्वयक प्रा.तेजस जयकर, मुख्य लिपिक संजय ठाकुर, सर्व विभाग प्रमुख, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!