प्रा. संतोष जोईल यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार सन 2023 जाहीर

प्रा. संतोष जोईल यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार सन 2023 जाहीर

*कोकण Express*

*प्रा. संतोष जोईल यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार सन 2023 जाहीर*

कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट कर्नाटक च्या वतीने दरवर्षी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते .यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेज फोंडाघाट सिंधुदुर्ग मधील मराठी विषयाचे प्रा. संतोष जोईल यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.हा पुरस्कार रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कोल्हापूर येथे संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.यावर्षी प्रा.संतोष जोईल यांना अनेक राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.प्रा. संतोष जोईल यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय आदर्श प्राध्यापक म्हणून त्यांची निवड करण्यात आली.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सेक्रेटरी खजिनदार सर्व संचालक मंडळ प्रशालेचे मुख्याध्याप शिक्षक कर्मचारी पालक ग्रामस्थ विद्यार्थी वर्गातून सरांचे कौतुक करण्यात येत आहे.सर उत्तम सूत्रसंचालक असून तळ कोकणातील विविध चळवळींमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!