पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

*कोकण Express*

*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा*

*सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) :*

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 10 व 11 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.35 वा मोपा विमानतळ येथे आगमन व केसरी सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता केसरी निवासस्थान येथे आनमन व राखीव. सांय. 5.30 वाजता केसरी येथून कुडाळकडे प्रयाण. सांय. 6.15 वाजता कुडाळ येथे आगमन व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहबंध कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ, हॉटेल आराध्य, झाराप, झिरो पाँईट,कुडाळ जि.सिंधुदुर्ग. रात्री 8.30 वाजता कुडाळ येथून केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. रात्री. 9.30 वाजता केसरी निवासस्थान येथे आगमन व राखीव.
मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता केसरी येथून सांगेली गाव ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता सांगेली गाव येथे आगमन व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी. स्थळ, सांगेली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या समवेत बैठक. सकाळी 10.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत बैठक. सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत अवकाळी पाऊस व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनेसंदर्भांत बैठक. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सार्वजनिक वितरण प्रणाली संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेसमवेत बैठक. सकाळी 11.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वन अधिकारी यांचे समवेत बैठक. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या समवेत आढावा बैठक. सकाळी 11.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचेसमवेत बैठक. दुपारी 12.30 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस निरिक्षक यांचे समवेत बैठक. दुपारी 1 वाजता दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळा, ओरोस जि. सिंधुदुर्ग या नविन वास्तुचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 ते 4 वाजता राखीव. सांय. 5 वाजता कुडाळ एम.आय.डी.सी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सांय. 7 वाजता कुडाळ येथून दाबोलिम विमानतळ, गोवा कडे प्रायाण. रात्री 9.30 वाजता दाबोलिम विमानतळ,गोवा येथे आगमन व राखीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!