*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यात शिवसेनेला राणेंचा धक्का..*
*शेकडो शिवसैनिक भाजपात दाखल;ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत वातावरण तापले..*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे.त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजपात दाखल होत आहे.वैभववाडी तालुक्यात शिवसेनेला नितेश राणेंनी जोरदार धक्का दिला.मांगवली शेकडो शिवसैनिक आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहेत.ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे.
वैभववाडी माजी सभापती सौ.सुवर्णा संसारे व महेश संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो ग्रामस्थांचा व शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे,तालुका अध्यक्ष नासिर काझी,भाजप प्रवक्ते भालचंद्र साठे,राजेंद्र राणे,समाजकल्याण सभापती श्रीमती शारदा कांबळे,वैभववाडी सभापती अक्षता डाफळे,बाळा हरियाण व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.