*कोकण Express*
*शहर काँग्रेसतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली शहर काँग्रेसतर्फे २० ते २२ जानेवारीदरम्यान शहर मर्यादित ‘राहुल चषक २०२३’ क्रिकेट स्पर्धा येथील विद्यामंदिरच्या पटांगणावर आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक १०,००० रु. व चषक, द्वितीय पारितोषिक ७,००० रु. व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालीकावीर अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी अजय मोर्ये (९४२३८०५९८२) राजू वर्णे (९४२२६३२६६३) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन शहराध्यक्ष अजय मोर्ये यांनी केले आहे.

