*कोकण Express*
*राज ठाकरेंचा दणका, सिंधुदुर्गातील कार्यकारणी बरखास्त…*
*परशुराम उपरकरांची माहिती…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौरा केल्यानंतर या ठिकाणी कार्यरत असलेल्या कार्यकारणीला मोठा दणका दिला आहे. जिल्हाध्यक्षांसह सर्व तालुकाध्यक्षांची सद्यस्थितीत कार्यरत असलेली कार्यकारणी त्यांनी रद्द केली आहे. याबाबत माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी दुजोरा दिला. दरम्यान येणाऱ्या काळात पुन्हा एकदा नव्याने संघटना बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.