*कोकण Express*
*गोट्या सावंत यांनी दारिस्तेत ठाकरे सेनेला पाडले खिंडार ; शाखाप्रमुख बंड्या सावंत भाजपात*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माजी जि प अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दारिस्तेत गावात उद्धव ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडले आहे. ठाकरे शिवसेनेचे शाखाप्रमुख बंड्या सावंत यांनी संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कनेडी येथील विभागीय संपर्क कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशावेळी बंड्या सावंतसह अन्य शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. कणकवली तालुक्यातील दारिस्थे शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख बंड्या सावंत यांचा माझी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश.

