*कोकण Express*
*कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट चे सुयश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट या प्रशाले मध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन आज दिनांक ०२/१२/२०२२ रोजी १९ वर्षाखालील मुले / मुली आणि १४ वर्षाखालील मुले यांचे करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुले या वयोगटात आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळवून मदर कबड्डी संघाची निवड जिल्हास्तर स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सदर १९ वर्षाखालील मुले या कबड्डी संघास मा. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कबड्डी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.