असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर उद्या हरिनाम सप्ताह

असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर उद्या हरिनाम सप्ताह

*कोकण Express*

*असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर उद्या हरिनाम सप्ताह*

*कणकवली ः प्रतिनिधी*

असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर हरिनाम सप्ताह दि.३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.सकाळपासूनच असलदे चव्हाटा येथे घटस्थापना व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

असलदे गावठण येथील चव्हाट्यावर दरवर्षी प्रमाणे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने सकाळी ९ वाजता घटस्थापना,वारकरी भजन,त्यानंतर दुपारी ग्रामस्थांनी व माहेरवाशिणी आपल्या ग्रामदैवताची ओटी भरण्याचा कार्यक्रम, मनोभावे पूजा केली. रात्री ८ ते १० वाजता वारकरी सांप्रदायिक मंडळ शिरगाव यांचे दिंडी भजन,सप्ताहानिमित्त संपूर्ण चव्हाटा परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे. रात्री १० वाजता पंचक्रोशीतील वारकरी भजने होणार आहेत.तरी भाविकांनी दर्शन घ्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!